शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पिंपरीत भररस्त्यात तरुणीची छेडछाड; जाब विचारला असता चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 1:53 PM

हिंजवडी पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देआई - वडिलांना जीवे मारून टाकीन व चेहऱ्यावरती ॲसिड फेकीन, अशी दिली धमकी

पिंपरी : भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन करून शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता, चेहऱ्यावर ॲसिड फेकीन, अशी धमकी दिल्याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तवाडी नेरे चौकात ३० ऑगस्टला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणीने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ९) फिर्याद दिली. नितीन खंडू शेळके (वय ३५, रा. चांदखेड, ता. मुळशी), असे आरोपीचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी व त्यांचे वडील काम संपवून रिक्षानं घरी जात असताना शेळके हा दुसऱ्या रिक्षातून पाठीमागून आला. त्यानं फिर्यादी यांच्या रिक्षाला स्वतःची रिक्षा आडवी लावली. फिर्यादीला त्यांच्या रिक्षातून खाली उतरवले. तू माझ्या संगे चल मी तुझ्या बरोबर लग्न केलंय, असं  म्हणून शेळकेने भररस्त्यात फिर्यादीसोबत गैरवर्तन केले.

त्याबाबत फिर्यादीच्या वडिलांनी त्याला जाब विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादीच्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन व चेहऱ्यावरती ॲसिड फेकीन, अशी धमकी देऊन आरोपी पळून गेला. आरोपीने फिर्यादी सोबत भररस्त्यात गैरवर्तन केले. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य आरोपीने केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला