कर्ज वसूल करण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 20:07 IST2019-09-01T20:05:00+5:302019-09-01T20:07:33+5:30
कर्ज वसूल करण्यासाठी जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) सकाळी थेरगाव येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कर्ज वसूल करण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग
पिंपरी : कर्ज वसूल करण्यासाठी जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) सकाळी थेरगाव येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार श्रीनाथ अंकुश वाघमारे (वय २१, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीने आरोपीकडून कर्ज घेतले. त्याच्या कर्जाचे थकलेले हप्ते वसूल करण्यासाठी श्रीनाथ शुक्रवारी सकाळी जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसला. तसेच त्याने महिलेचा विनयभंग केला. श्रीनाथ याने महिलेला शिवीगाळ करत तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.