"मै तेरी शादी नही होने दुंगा..."; पिंपरी-चिंचवडमध्ये भररस्त्यात महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 18:22 IST2022-11-17T18:22:01+5:302022-11-17T18:22:10+5:30
महिलेने गाडीमध्ये बसण्यास विरोध केला असता आरोपीकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य...

"मै तेरी शादी नही होने दुंगा..."; पिंपरी-चिंचवडमध्ये भररस्त्यात महिलेचा विनयभंग
पिंपरी : मध्यरात्री मोबाइलवर मेसेज करून महिलेला सार्वजनिक रस्त्यावर बोलावले. त्यानंतर मनास लज्जा होईल असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. वाकड येथील सार्वजनिक रस्त्यावर सोमवारी (दि. १४) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
राहुल बेस (वय २९, रा. वाकड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने बुधवारी (दि. १६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपीने फिर्यादी महिलेच्या मोबाइलवर मेसेज करून वाकड येथील एका जिम समोर सार्वजनिक रस्त्यावर बोलवले. त्यानंतर महिलेला जबरदस्तीने गाडीमध्ये बसण्यास सांगितले. महिलेने गाडीमध्ये बसण्यास विरोध केला असता तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. 'मुझे तेरे साथ रहना है, मै तेरे को नही छोडुंगा, असे आरोपी म्हणाला. 'तेरी किसी ओरसे शादी हो जाएगी तो मै तेरी शादी नही होने दुंगा, असे म्हणून आरोपीने धमकी दिली. त्यानंतर आरोपीने चारचाकी गाडीतून फिर्यादी महिलेचा पाठलाग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.