Pune Crime | कोर्टातील केसमध्ये मदत करतो म्हणत महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 15:01 IST2023-02-27T15:00:26+5:302023-02-27T15:01:51+5:30
महिलेची एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद...

Pune Crime | कोर्टातील केसमध्ये मदत करतो म्हणत महिलेचा विनयभंग
पिंपरी : मनात लज्जा उत्पन्न होईल असा व्हॉट्सवर मेसेज करून तसेच फोन करून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे बोलून महिलेचा विनयभंग केला. ही घटना दोन जुलै २०२२ ते दोन फेब्रुवारी २०२३ या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडली. या प्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रमेश दशरथ वाघदरे (वय ४२, ता. पडाळवाडी, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यावर दाखल केसमध्ये मदत करतो, असे म्हणत हाय हॅलो, गुडमॉर्निंग, गुड नाईट असे आरोपी फिर्यादीला मेसेज केले. त्यानंतर मनात लज्जा उत्पन्न होईल, असे मेसेज करत शरीरसुखाची मागणी केली. तसेच माझी पोलीस स्टेशनला ओळख तुझ्यावर केस करतो तुझे स्टेटस ठेवतो, असे म्हणत फिर्यादीस वारंवार धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.