अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपीला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 19:31 IST2018-07-11T19:31:13+5:302018-07-11T19:31:58+5:30

सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीचा ५५ वर्षीय इसमाने विनयभंग केला. ही घटना रविवारी पिंपळे सौदागर येथे घडली.

Molestation of minor girl; The accused arrested | अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपीला अटक 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपीला अटक 

ठळक मुद्दे पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

पिंपरी : सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीचा ५५ वर्षीय इसमाने विनयभंग केला. ही घटना रविवारी पिंपळे सौदागर येथे घडली. या प्रकरणी आरोपीस मंगळवारी अटक करण्यात आली. शिवकुमार बंडप्पा नवाखंडे (वय ५५ रा. लोंढे वस्ती, ताथवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोसायटीच्या बिल्डींगमध्ये दुपारी दोनच्या सुमारास खेळत होती. आरोपीने मुलीला बोलावून घेतले आणि तिच्यासोबत अश्लिल चाळे केले. घडलेला सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने तत्काळ सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी शिवकुमार याला मंगळवारी अटक केली. त्याच्याविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Molestation of minor girl; The accused arrested