कचरा टाकायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 17:24 IST2019-08-19T17:21:23+5:302019-08-19T17:24:01+5:30
या प्रकरणी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

कचरा टाकायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पिंपरी : कचरा टाकण्यासाठी बाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करत विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. १७) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मिलींदनगर, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सिताराम शंकर उत्तेकर (वय ५५) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारो पिडीत मुलगी घरातील कचरा टाकण्यासाठी बाहेर आली. कचरा टाकून पार्किंगमध्ये आली असता तिथे आलेल्या आरोपी सिताराम याने तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. तसेच ‘पार्किंगमध्ये खेळणाऱ्या मुलांना तू ओरडत का नाही’ असे म्हणत दमदाटी केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.