molestation complaint filed against rickshaw driver at Baner | बाणेरला रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

बाणेरला रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

हिंजवडी : कंपनीतून घरी जात असताना महिलेचा विनयभंग केला. बाणेर येथे शुक्रवारी (दि. १४) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला बाणेर येथील एका कंपनीतून कामावरून शुक्रवारी (दि. १४) रात्री साडेआठच्या सुमारास घरी जात होत्या. त्यावेळी बाणेर येथील पाषाण - सूसरोडवर त्या आल्या असताना त्यांच्या पाठीमागून एक रिक्षा हळूहळू येत असल्याचे त्यांना जाणविले. त्यामुळे त्या बाजूला झाल्या. त्यानंतर सदरची रिक्षा पुढे जाऊन थांबली. त्यावेळी रिक्षाचालकाने फिर्यादी महिलेला आवाज देत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: molestation complaint filed against rickshaw driver at Baner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.