molastation of beatings on suspicion of complaining to police | पोलिसांत तक्रार दिल्याच्या संशयावरून मारहाण करून विनयभंग
पोलिसांत तक्रार दिल्याच्या संशयावरून मारहाण करून विनयभंग

पिंपरी : पोलिसांत तक्रार दिल्याने संशयावरून महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग केला. पिंपरी रेल्वे स्टेशनलगत भारतनगर येथे बुधवारी (दि. २०) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबा बब्रु रणदिवे (वय ३७), रिना बाबा रणदिवे (वय ३२), डिंका सागर थोरात (वय २४, सर्व रा. भारतनगर, पिंपरी), मीना (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेचा पती चंदू कांबळे यांचा २००७ मध्ये खून झाला असून, त्यातील आरोपी बाबा बब्रु रणदिवे हा याप्रकरणी निर्दोष सुटला आहे. त्याविरुद्ध फियार्दी न्यायालयात अपिल करणार आहे, अशी कुणकुण आरोपींना लागली. त्या कारणावरून मंगळवारी (दि. १९) फियार्दी महिलेच्या भावाने आरोपी बाबा रणदिवे व आरोपी डिंका थोरात यांच्या विरोधात तक्रार दिली. फियार्दी यांनी सांगितल्यावरून ती तक्रार दिल्याचा संशयावरून आरोपींनी फियार्दी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: molastation of beatings on suspicion of complaining to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.