शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनी शिक्षणासाठी दिला मोबाईल, अकरा वर्षांच्या मुलीने बनविला व्हिडिओ अश्लील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 16:24 IST

कोरोनाचा धोका वाढत असल्याने सध्या मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब , लॅपटॉप याद्वारे मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.मात्र एक पालकांना आपल्या मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाइल हाती देणे चांगलेच महागात पडले आहे...

पिंपरी : ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी मुलीला मोबाईल घेऊन दिला. मात्र मुलीने अश्लील व्हिडीओ बनवून समाज मध्यमावरील मित्राला पाठविल्याचे समोर आले आहे.

पिंपरी चिंचवड मधील एका अकरा वर्षाच्या मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी मोबाईल घेऊन दिला. वडिलांनी सहज मोबाईल पाहिला असता तिच्या मोबाईलवर तिचाच अश्लील व्हिडीओ दिसला. या बाबत मुलीला विचारले असता समाज माध्यमावरील मित्राने व्हिडीओ पाठविण्यासाठी धमकी दिल्याचे सांगितले. तसेच व्हिडीओ न पाठविल्यास घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वडिलांनी सायबर सेलकडे धाव घेतली.

पोलिसांनी मुलीच्या मोबाईलची तपासणी केली. तिने एका व्यक्तीला अश्लील व्हिडीओ पाठविल्याचे समोर आले. तसेच तिने समाज माध्यमावर अश्लील संभाषण केल्याचे पोलिसांना आढळले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिशाभूल केल्याचे दिसून आले.

सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संजय तुंगार म्हणाले, संबंधित मुलीने अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठविला आहे. तसेच समाज माध्यमावर अश्लील संभाषण केल्याचे समोर आले आहे. समाज माध्यमावरील मित्राला काही पैसे दिल्याचे सांगितले आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थीEducationशिक्षणonlineऑनलाइन