बलात्कार करून काढले अश्लील व्हिडीओ अन् ब्लॅकमेल करून उकळले लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:18 IST2021-10-08T15:18:19+5:302021-10-08T15:18:48+5:30
बलात्कार केल्यावर व्हिडीओ आणि फोटो महिलेच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत तरुणाने महिलेकडून तीन लाख रुपये घेतले.

बलात्कार करून काढले अश्लील व्हिडीओ अन् ब्लॅकमेल करून उकळले लाखो रुपये
पिंपरी : महिलेवर बलात्कार करत तीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. ते व्हिडीओ आणि फोटो महिलेच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत तरुणाने महिलेकडून तीन लाख रुपये घेतले. ही घटना ५ मे २०१९ ते जुलै २०२० या कालावधीत म्हाळुंगे गावठाण ता. मुळशी येथे घडली.शुभम अशोक दरंदले (वय २५, रा. सोनाई, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने गुरुवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला त्याच्या भाड्याच्या फ्लॅटवर नेऊन तिथून बाहेर जाण्यास अटकाव करून बळजबरीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंध करतानाच्या वेळी आरोपीने महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. ते फोटो महिलेच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून महिलेकडून तीन लाख रुपये घेतले. तसेच महिलेला अश्लील भाषेत बोलून तिला मेसेज करून तिचा विनयभंग केला.