मनाेरुग्ण मुलाने केली आईची निघृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 17:21 IST2019-04-28T17:19:41+5:302019-04-28T17:21:14+5:30
मनोरुग्ण असलेल्या मुलाने कात्रीने वार करुन आपल्या आईची निघृण हत्या केल्याची घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली.

मनाेरुग्ण मुलाने केली आईची निघृण हत्या
पिंपरी : मनोरुग्ण असलेल्या मुलाने कात्रीने वार करुन आपल्या आईची निघृण हत्या केल्याची घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली. हा प्रकार रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आला.
सुमन विजय सावंत (वय ६०, रा. गुरुद्वारा रोड, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर भूपेंद्र विजय सावंत (वय ४०) असे आराेपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भूपेंद्र हा मनोरुग्ण असून त्याने यापुर्वीही आईच्या डोक्यात चाकू मारला होता. दरम्यान, रविवारी सकाळी भूपेंद्र याने आईवर कात्रीने वार केले. त्यानंतर तो पसार झाला. मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सुमन सावंत यांचा मृत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा करण्याचे काम सुरु असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.