शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बैठका खूप झाल्या, शहराध्यक्ष कधी?

By admin | Updated: August 28, 2015 04:20 IST

बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ खूप झाले. आता शहराध्यक्ष नियुक्त कराच, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली. येत्या १५ दिवसांत शहराध्यक्षाचे

पिंपरी : बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ खूप झाले. आता शहराध्यक्ष नियुक्त कराच, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली. येत्या १५ दिवसांत शहराध्यक्षाचे नाव निश्चित केले जाणार असल्याचे आश्वासन गुुरुवारी झालेल्या विधानसभानिहाय बैठकीत देण्यात आले. यामुळे शहर नेतृत्वाची प्रतीक्षा कायम आहे. शहराध्यक्षाची निवड, येत्या महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर पक्षबांधणी, कार्यकर्त्यांची भूमिका आदी संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे, विद्यार्थी, वाहतूक, कामगार, महिला, पर्यावरण आदी विभागांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रभागनिहाय आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये गुरुवारी झाली. चिंचवड, पिंपरी व भोसरी असे विधानसभानिहाय वेगवेगळी बैठक झाली. पक्षनेते व प्रवक्ते अनिल शिदोरे, नेते शिरीष सावंत, राज्य सचिव वसंत फडके यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सकाळी अकराला सुरू झालेली बैठक सायंकाळी सातला संपली. बैठकीस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शहराध्यक्ष कसा असावा, सध्याची पक्षाची स्थिती, पक्षबांधणीसाठी काय धोरण असावे, नाराजीची कारणे आदींबाबत कार्यकर्त्यांनी आपली मते मोकळेपणाने मांडली. कार्यकर्ते मनसोक्त बोलले. शहराध्यक्षाच्या निवडीबाबत गेल्या चार वर्षांपासून अनेक बैठका झाल्या. आता बैठका आणि चर्चा पुरे, असे ठणकावून सांगत, त्वरित शहराध्यक्ष नियुक्त करण्याची आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांचा रोख पाहून येत्या १५ दिवसांच्या आत शहराध्यक्षाची निवड निश्चित केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठांनी दिले. बैठकीचा अहवाल ते पक्षनेते राज ठाकरे यांना देणार आहेत. ठाकरे हे पुणे मुक्कामी आहेत. चर्चेतून शहराध्यक्षाचे नाव ठरविले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)शहराध्यक्ष निवडीसंदर्भातील ही पहिलीच बैठक होती. यापूर्वी याबाबत एकही बैठक झाली नाही. चिंचवड येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यापूर्वी विधानसभा आणि लोकसभा उमेदवारीबाबत बैठका झाल्या होत्या. १५ दिवसांच्या आत कोणत्याही परिस्थितीत शहराध्यक्षाची निवड जाहीर केली जाणार आहे.- अनिल शिदोरे