चिंचवडमध्ये मेकॅनिकल इंजिनियरची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 19:40 IST2018-08-10T19:38:42+5:302018-08-10T19:40:22+5:30
अभिजीत हे हिंजवडीतील एका नामांकित कंपनीत नोकरीला होते.

चिंचवडमध्ये मेकॅनिकल इंजिनियरची आत्महत्या
पिंपरी : हिंजवडीतील आयटी कंपनीत नोकरीस असलेल्या मेकॅनिकल इंजिनियरने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी घडली. अभिजीत रामदास मुळे (वय ३८, सध्या रा.बिजलीनगर, चिंचवड, मूळ-कळंब, उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिजीत हे हिंजवडीतील एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अभिजीत यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.