पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवसात तीन टोळ्यांवर ‘मोक्का’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 09:52 IST2022-12-09T09:51:17+5:302022-12-09T09:52:26+5:30
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या कार्यक्षेत्रातील तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का....

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवसात तीन टोळ्यांवर ‘मोक्का’
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात भरदिवसा झालेल्या गोळीबारानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या कार्यक्षेत्रातील तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत गुरुवारी कारवाई केली. कुणाल उर्फे बाबा धीरज ठाकूर (वय २२, रा.तळेगाव दाभाडे), करणसिंग राजपुतसिंग दुधाणी (वय २५, रा. हडपसर), सत्यम उर्फे पप्पू दत्तात्रय कड (रा. कडाची वाडी, चाकण) अशी कारवाई केलेल्या टोळीप्रमुखांची नावे आहेत.
पप्पू कडवर याच्यावर खून, खुनाच प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला असे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, बाबा ठाकूर आणि त्याच्या टोळीतील १३ जणांवर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. करणसिंग राजपूत यांच्यावर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दरोड्याची तयारी करणे, घरफोडी, पिस्तुल जवळ बाळगणे असे गंभीर आठ गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत.