Bridge Collapses : 'भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या'; सोशल मीडियावर टीका 

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 20:59 IST2025-06-15T20:58:58+5:302025-06-15T20:59:39+5:30

भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत. 

Maval Kundamala Bridge Collapses 'Don't spare the corrupt. Take death seriously', criticism on social media | Bridge Collapses : 'भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या'; सोशल मीडियावर टीका 

Bridge Collapses : 'भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या'; सोशल मीडियावर टीका 

पिंपरी: स्थानिक आमदारांनी या पुलावर लक्ष घालायला पाहिजे होतं. हा पुल पादचाऱ्यांसाठी होता. मात्र, लोक दुचाकी नेत होते. असे आमदार काहीही बोलत आहेत. येथे दुचाकीचा विषय नाही. या पुलाची डागडुजी केलेली नाही. लक्ष दिलेलं नाही. याप्रकरणी मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा. भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत. 

प्रितेश बालघाट म्हणाले, 'प्रशासकीय अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा. तेथील संबंधित अधिकारी कोण, ते शोधा. भ्रष्टाचारांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या.' 
 
धनंजय पुरकर म्हणाले, 'मी माझ्या मित्राला लगेच फोन केला. त्यांनी सांगितलं आम्ही सगळ्या लोकांना सांगतो की, हा पूल जीर्ण झाला आहे. त्याच्यावर मोटरसायकल वगैरे घेऊन जाऊ नका. जास्त गर्दी करू नका, पण हल्ली लोक रिल्स बनवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात टाकतात. हल्लीचे मुलं-मुली ऐकत नाहीत. त्याचा त्रास त्यांच्या आई-वडीलांना होतो.' 
 
अविनाश छत्रे म्हणाले, या घटनेला शंभर टक्के शासन जबाबदार आहे. मी कमीत कमी या ठिकाणी पाच ते सहा वेळा गेलेलो आहे. शासनाने पुलाच्या बाजूला लिहिलेला आहे की, हा पूल धोकादायक आहे आणि यावर जाऊ नये. पण हा पूल तोडून टाकायला पाहिजे होता. कारण हा फुल खूप खराब झालेला होता.
 
सतीश कंक म्हणाले, 'स्थानिक आमदारांनी या पुलावर लक्ष घालायला पाहिजे होतं. हा पुल पादचाऱ्यांसाठी होता. मात्र, लोक दुचाकी नेत होते. असे आमदार काहीही बोलत आहेत. येथे दुचाकीचा विषय नाही. या पुलाची डागडुजी केलेली नाही. लक्ष दिलेलं नाही. याप्रकरणी मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा.'
 
प्रदीप गोंजारी म्हणाले, 'लोकं कोणत्याही परिसरामध्ये फिरायला गेल्यानंतर त्या परिसराचा आनंद न घेता सेल्फी काढण्याच्या नादात, स्टेटसला ठेवण्याच्या नादात, आपले जीव गमवत आहेत. तिथल्या परिसराचा व तेथील असलेल्या वस्तूंचा वापर योग्य पद्धतीने करत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे.'

Web Title: Maval Kundamala Bridge Collapses 'Don't spare the corrupt. Take death seriously', criticism on social media