नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 19:00 IST2025-06-15T18:59:17+5:302025-06-15T19:00:49+5:30

मावळातील शेलारवाडी जवळ इंद्रायणी नदीवर साकव पूल आहे. तो पुल अरुंद आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून करावा येथील नागरिकांना प्रवास करावा लागत होता. एक तर हा पूल अतिशय अरुंद असून एका वेळी एकच दुचाकी पुलावरुन जाऊ शकते.

Maval Kundamala Bridge Collapses Citizens expressed the possibility of an accident; Public Works Department administration ignored it | नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

मावळ (पिंपरी-चिंचवड)  :मावळमधील शेलारवाडीजवळील कुंडमळ्यातील साकव पुल धोकादायक असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी पूल कोसळला आहे. धोकादायक पूल आणि तुटलेले कठडे, बाहेर निघालेल्या लोखंडी सळ्या यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली होती. 

मावळातील शेलारवाडी जवळ इंद्रायणी नदीवर साकव पूल आहे. तो पुल अरुंद आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून करावा येथील नागरिकांना प्रवास करावा लागत होता. एक तर हा पूल अतिशय अरुंद असून एका वेळी एकच दुचाकी पुलावरुन जाऊ शकते. या परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे अनेक वेळा जीव मुठीत धरून पर्यटकांना प्रवास करावा लागत आहे. 

शेलारवाडी ते कुंडमळा या भागाला जोडणारा हा प्रमुख पूल आहे.  संरक्षण विभागाने प्रथम लोखंडी साकव पूल बांधला होता. परंतु तो पूर्ण नव्हता. या पुलाच्या दोन्ही बाजूने उतार होता. पावसाळ्यात इंद्रायणीला पाणी आले की नागरिकांना प्रवास करणे धोकादायक झाले होते. त्यामुळे नागरिक या पुलावरुन जाणे टाळत असत.
 
पुलाचे ऑडिट करण्याची मागणी

देहूरोडकडून इंदोरीमार्गे आणि देहूरोडकडून देहूगाव, सांगुर्डी ते कॅडबरी कंपनीमार्गे कुंडमळा आणि कान्हेवाडीकडे जावे लागत होते. २५ वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार रुपलेखा ढोरे यांनी या लोखंडी पुलाला जोडून पुढे मिसाईल प्रकल्पाच्या भिंतीपर्यंत समांतर असा सिमेंटमध्ये पूल जोडला होता. त्यामुळे नागरिक ये-जा करू शकत होते; परंतु सध्या हा पूल कमजोर झाला असून, एका ठिकाणी किमान सात ते आठ फूट लांबीपर्यंत या पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. त्याच्या सळ्या उघड्या पडल्या असल्यामुळे एखाद्याचा चुकून तोल गेला तर जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या पुलाचे ऑडिट करून हा पूल किमान सात ते आठ फुटांचा तयार करावा. तसेच, बोडकेवडी आणि कान्हेवडीला जोडणार्‍या बंधार्‍याचे देखील दुरुस्ती करून त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दुरुस्तीच्या कामात आडकाठी

बोडकेवडी आणि कान्हेवडीला जोडणाऱ्या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. येथून दुचाकीवरून प्रवास करताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने आतापर्यंत अनेकांना जलसमाधी मिळाली आहे. मात्र, या पुलाच्या कामात संरक्षण विभाग आडकाठी आणत असल्यामुळे याचे काम रखडले आहे. कुंडमळा येथील पूल धोकादायक झाला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल. – रवींद्र भेगडे,  प्रचारप्रमुख, मावळ भाजप

Web Title: Maval Kundamala Bridge Collapses Citizens expressed the possibility of an accident; Public Works Department administration ignored it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.