विवाह जुळविणाऱ्या वेबसाईटवरील ओळख पडली महागात, महिलेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 20:56 IST2019-07-04T20:43:57+5:302019-07-04T20:56:55+5:30
विवाह जुळविणाऱ्या वेबसाईटवर ओळख निर्माण करून विश्वास संपादन केला. लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नातेवाईकांना दाखविण्याची धमकी दिली.

विवाह जुळविणाऱ्या वेबसाईटवरील ओळख पडली महागात, महिलेवर अत्याचार
हिंजवडी : विवाह जुळविणाऱ्या वेबसाईटवर ओळख निर्माण करून विश्वास संपादन केला. लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नातेवाईकांना दाखविण्याची धमकी दिली. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २७ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहूल प्रकाश दास (वय ३०, रा. डांगेचौक, थेरगाव, मुळ गाव परांडा, जि. उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे. विवाह जुळविणाऱ्या एका वेबसाईटवर आरोपी राहुल दास याने पिडीत महिलेशी ओळख केली. लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. मे २०१८ ते २५ जून २०१९ या कालावधीत डांगेचौक, हडपसर याठिकाणी महिलेवर अत्याचार केला. त्याचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल करून नातेवाईकांना दाखवण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करत आहेत.