'माहेरहून ३० तोळ सोनं आण', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 17:25 IST2022-08-08T17:24:08+5:302022-08-08T17:25:08+5:30

पतीला अटक केली असून दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल

married woman commits suicide after suffering from father-in-law in pimpri | 'माहेरहून ३० तोळ सोनं आण', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

'माहेरहून ३० तोळ सोनं आण', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पिंपरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. ६) दत्तवाडी आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली. तसेच इतर दोन महिलांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला. 

प्रवीण गोविंद कुटे (वय ३८) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. त्याच्यासह दोन महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमृता प्रवीण कुटे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील महादेव चंद्रकांत गवळी (वय ४५, रा. शिवणे, पुणे) यांनी रविवारी (दि. ७) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या मुलीला ८ मे २००९ ते ६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत त्रास दिला. अमृता यांना शिवीगाळ, मारहाण करून घरातून हाकलून देण्याची धमकी आरोपींनी दिली. माहेरहून ३० तोळे सोने आणण्याची मागणी केली. त्यावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून अमृता यांनी शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: married woman commits suicide after suffering from father-in-law in pimpri