पिंपरी-चिंचवड: पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने विवाहितेचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 18:06 IST2022-02-01T18:05:53+5:302022-02-01T18:06:19+5:30

पिंपरी : पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिच्या आई- वडील व भावास ...

marital harassment by opposing husbands extramarital affair | पिंपरी-चिंचवड: पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने विवाहितेचा छळ

पिंपरी-चिंचवड: पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने विवाहितेचा छळ

पिंपरी : पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिच्या आई- वडील व भावास जिवे मारण्याची धमकी दिली. मोशी -चिखली रोड, पुणे येथे २०१२ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

मोहसीन अजिम जाकीर हुशेन शेख (वय ३९, रा. मोशी चिखली रोड, पुणे), असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीकडे फ्लॅट घेण्यासाठी वारंवार पैशांची मागणी केली. त्यावरून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला.

आरोपीचे चार वर्षांपासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध असून त्याला विवाहितेने विरोध केला. त्या कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण केली. तसेच फिर्यादीचे आई-वडील आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस हवालदार राकेश बनसोडे तपास करीत आहेत.

Web Title: marital harassment by opposing husbands extramarital affair