Namdev Shastri : नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनास मराठा समाजाचा विरोध
By विश्वास मोरे | Updated: February 4, 2025 18:57 IST2025-02-04T18:57:08+5:302025-02-04T18:57:51+5:30
पोलिसांची सूचना मिळाल्याने भंडारा डोंगरावरील किर्तन रद्द

Namdev Shastri : नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनास मराठा समाजाचा विरोध
पिंपरी : भंडारा डोंगरावर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे कीर्तन दिनांक ७ फेब्रुवारीला होणार होते. मात्र मराठा समाजाने विरोध केला. त्यामुळे पोलिसांच्या विनंतीनुसार कीर्तन रद्द करण्यात आले आहे, असे भंडारा डोंगर विश्वस्त भंडारा डोंगर ट्रस्ट विश्वस्तांनी कळवले आहे.
श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज यांचे जन्मदिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी रात्री आठला नामदेव महाराज शास्त्री यांचे किर्तन होणार होते. मात्र, मस्साजोग येथील येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी नामदेव महाराज शास्त्री (भगवानगड) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली.
भंडारा डोंगरावरील कीर्तनास मराठा समाजाने विरोध केला. त्यामुळे तळेगाव पोलिसांनी भंडारा डोंगर दशमी समितीला पत्र दिले व किर्तन रद्द करावे, अशी विनंती केली त्यानुसार ट्रस्टने कीर्तन रद्द केले आहे.
काय म्हटले आहे पोलिसांच्या पत्रात
हभप नामदेव शास्त्री यांच्या कीर्तनास सकल मराठा समाजाकडुन विरोध शक्यता नाकरता येत नाही. किर्तन झाल्यास कार्यक्रम ठिकाणी मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते एकत्र येवुन एक मराठालाख मराठा अशी घोषणाबाजी करुन नामदेव महाराज शास्त्री यांचे तोंडाला काळे फासण्याची शक्यता आहे, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होवु शकतो अशी माहिती पोलीस ठाण्यास माहिती मिळाली आहे, त्यामुळे नियोजित किर्तन रद्द करावे.