Maharashtra Election 2019 : Show space to no Loyalty : bala bhegade | Maharashtra Election 2019 : निष्ठा नसणाऱ्यांना मावळवासीय मतदारांनी जागा दाखवावी : बाळा भेगडे
Maharashtra Election 2019 : निष्ठा नसणाऱ्यांना मावळवासीय मतदारांनी जागा दाखवावी : बाळा भेगडे

ठळक मुद्देमाझे प्राधान्य, मावळ परिसराच्या सर्वांगिण विकासाला

तळेगाव दाभाडे : अगोदर मी छत्रपती शिवाजीमहाराज यांचा मावळा आहे, मग राज्यमंत्री आणि आमदार आहे. त्यामुळे माझ्या अंगात निष्ठा आहे म्हणून मी पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही, त्यांना मावळवासीय मतदारांनी जागा दाखवावी, असे आवाहन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शुक्रवारी प्रचारात व्यक्त केले. 
आंदर मावळमध्ये राज्यमंत्री भेगडे यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरमरवस्ती, टाकवे बुद्रुक, फळने, माऊ, वडेश्वर, नागथली, वाउंड, कचरेवाडी, देशमुखवाडी, घोणशेत, वाहनगाव, बोरवली, तळपेवाडी आदी गावांतील ग्रामस्थांशी भेगडे यांनी संवाद साधला. या वेळी स्थानिक रहिवासी व नागरिकांनी विकासकामांबद्दल कौतुक करीत राज्यमंत्री भेगडे यांचा सत्कार केला. 
या वेळी बोलताना भेगडे म्हणाले,‘‘मी विरोधाला व विरोधकांना महत्त्व देत नाही. माझे प्राधान्य मावळ परिसराच्या सर्वांगिण विकासाला आहे. भूमिपूत्र म्हणून मी इथल्या जनतेशी व त्यांच्या विकासासाठी बांधील आहे. गावातील लोकांना घरकुल योजना, बांधकाम कामगार योजना, विमा योजना अशा अनेक योजनांचा 
लाभ देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.’’
.......
आम्हाला सत्तेतील मंत्री हवा!
४नाणे : नाणे परिसरात फ टाके  आणि ढोल-ताशे यांच्या गजरात राज्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. बाळाभाऊ भेगडे ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आम्हाला विरोधातील आमदार नको, सत्तेतील मंत्री हवा!’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या गावांमधील ८१७ बांधकाम मजुरांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ४२९ जणांच्या खात्यावर लाभाचा निधी जमा झालेला आहे. अशाच अनेक सोयीसुविधा देण्यासाठी मी बांधील आहे, असे राज्यमंत्री भेगडे यांनी सांगितले. 


Web Title: Maharashtra Election 2019 : Show space to no Loyalty : bala bhegade
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.