पिंपरी चिंचवडमधील प्रेमीयुगुलांना हवे हक्काचे कपल पार्क! ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त मागणीची पुन्हा चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 12:11 PM2024-02-14T12:11:48+5:302024-02-14T12:12:51+5:30

प्रेमीयुगुलांना एकमेकांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी लागणाऱ्या एकांतासाठी जागेची कमतरता प्रकर्षाने भासते...

Lovers in Pimpri want the right couple park! Re-discussion of demand on the occasion of 'Valentine's Day' | पिंपरी चिंचवडमधील प्रेमीयुगुलांना हवे हक्काचे कपल पार्क! ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त मागणीची पुन्हा चर्चा

पिंपरी चिंचवडमधील प्रेमीयुगुलांना हवे हक्काचे कपल पार्क! ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त मागणीची पुन्हा चर्चा

पिंपरी : प्रेमाबाबत हितगूज करण्यासाठी कोणताही मुहूर्त नसतो. पण, हे प्रेम व्यक्त करण्यासाठी बहुतांश प्रेमीयुगुलांना कॅफेचा, हॉटेलचा किंवा सार्वजनिक उद्यानाचा आधार घ्यावा लागतो. दरवर्षी व्हॅलेंटाईन डे दरम्यान तरुणाईकडून प्रेमीयुगुलांसाठी पिंपरी-चिंचवड शहरात ‘कपल गार्डन’ किंवा ‘कपल पार्क’ करण्याची मागणी होते. पण, अद्याप ती पूर्ण झालेली नाही.

प्रेमीयुगुलांना एकमेकांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी लागणाऱ्या एकांतासाठी जागेची कमतरता प्रकर्षाने भासते. पिंपरी-चिंचवड शहरात १८७ हेक्टरवर महापालिकेची १८९ उद्याने आहेत. यातील संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली, निगडी येथील दुर्गा टेकडी, थेरगाव बोट क्लब येथे प्रेमीयुगुलांची संख्या अधिक असते. या जागांवर प्रेमीयुगुलांनी कितीही हक्क सांगितला, तरी यातील बहुतांश ठिकाणी प्रेमीयुगुलांखेरीज फिरण्यास आलेली कुटुंबे, तरुणांचे घोळके, ज्येष्ठांचे मेळे, विक्रेते भटकत असतात. अशा वेळी एकांत हवा म्हणून बाहेर पडलेल्या प्रेमीयुगुलांसाठी या जागा सोयीच्या ठरत नाहीत.

सार्वजनिक ठिकाणी जोडीदाराला विकृत नजरांपासून दूर ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. एकमेकांना हितगूजही साधता येत नाही. एकांतात गप्पाही मारता येत नाहीत. त्यामुळे जर लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात पार्क असू शकतात, तर मग प्रेमीयुगुलांसाठी ‘कपल गार्डन’ किंवा ‘कपल पार्क’ असावे, अशी अपेक्षा प्रेमीयुगुलांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रेमीयुगुलांना बसण्यासाठी हक्काची जागा नसल्याने सार्वजनिक ठिकाणांचा आसरा घ्यावा लागतो. सोबतच अनेक वाईट प्रसंगांचा सामनाही करावा लागतो. अशा घटना टाळण्यासाठी कपल गार्डन असावे.

- के. अभिजित, अध्यक्ष, राईट टू लव्ह, अनहद सोशल फाऊंडेशन

Web Title: Lovers in Pimpri want the right couple park! Re-discussion of demand on the occasion of 'Valentine's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.