शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

औरंगाबादेत प्रेयसीचा खून करून पसार झालेला प्रियकर लोणावळ्यात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 9:00 PM

दुसऱ्या सकाळी इंदू हिच्या घरच्यांना समजलं की औरंगाबाद येथील राजनगर विभागातील एका मोकळ्या मैदानात एक युवती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. त्यांनी तेथे जाऊन बघितले असता ती इंदू असल्याचे त्यांच्या लक्षात आले

लोणावळा : आपल्या प्रेयसीचे इतर कोणाबरोबर तरी प्रेमप्रकरण चालू असल्याच्या संशयातून तिचा खून करून औरंगाबाद येथून पसार होत लोणावळ्यात आलेल्या खूनी प्रियकराला लोणावळा शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद करीत उल्लेखनीय अशी कामगिरी केली. भोला कुमार (वय 27, मूळ राहणार गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या खुनी प्रियकराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोला कुमार याचे मृत तरुणी इंदू बरखू राय (वय 22, रा. मुकुंद नगर, रामकाठी, औरंगाबाद) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. भोला कुमार हा या तरुणीच्या वडिलांच्यासोबत प्लंबिंगचे काम करीत होता. मागील दीड वर्षांपासून त्यांच्याच घरी राहण्यास होता. यादरम्यान त्याचे आणि इंदू हिचे सूत जुळले. मात्र इंदू हिच्या घरात हे समजल्यावर भोलाकुमार याला इतरत्र बाहेर राहण्यासाठी जावं असं इंदू हिचा मोठा भाऊ सुनील याने सांगितले. त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नेहमीप्रमाणे इंदू ही कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. यावर तिच्या घरच्यांनी भोलाकुमार याच्याशी संपर्क साधला असता त्याने देखील त्यांच्यासोबत इंदूचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र उशिरापर्यंत तिचा काहीही तपास लागला नाही.

दुसऱ्या सकाळी इंदू हिच्या घरच्यांना समजलं की औरंगाबाद येथील राजनगर विभागातील एका मोकळ्या मैदानात एक युवती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. त्यांनी तेथे जाऊन बघितले असता ती इंदू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिला हॉस्पिटलमध्ये नेले असता ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान त्यांनी भोलाकुमार याला फोन केला असता त्याचा फोन बंद लागत असल्याने त्यांना त्याचा संशय आला व त्यांनी औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. 

पोलिसांनी त्याचा माग काढला असता तो लोणावळ्यात पळून येत असल्याचे त्यांना समजले. त्या महितीच्या आधारे औरंगाबाद पोलिसांनी लोणावळा पोलिसांना माहिती दिली असता लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील आणि पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस नाईक अजीज मिस्त्री, पोलीस काॅन्स्टेबल हनुमंत शिंदे, स्वप्निल पाटील, मनोज मोरे, गणेश अकोलकर यांनी लोणावळ्यातील सेंटर पॉईंट याठिकाणी आपलं कौशल्य पणाला लावीत सापळा रचला आणि भोला कुमार याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आरोपीला औरंगाबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद