लोणावळ्यामध्ये २४ तासांत १६३ मिमी

By Admin | Updated: July 3, 2016 03:53 IST2016-07-03T03:53:42+5:302016-07-03T03:53:42+5:30

परिसरात शुक्रवारपासून दमदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळी ८ ते शनिवारी सकाळी ८ या २४ तासांत शहरात तब्बल १६३ मिमी पाऊस झाला.

In Lonavla, in 24 hours, 163 mm | लोणावळ्यामध्ये २४ तासांत १६३ मिमी

लोणावळ्यामध्ये २४ तासांत १६३ मिमी

लोणावळा : परिसरात शुक्रवारपासून दमदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळी ८ ते शनिवारी सकाळी ८ या २४ तासांत शहरात तब्बल १६३ मिमी पाऊस झाला.
शनिवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान ७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. लोणावळा व पाऊस हे समीकरण असले, तरी जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने नागरिक हवालदिल झाले होते. जुलैच्या पहिल्याच दिवशी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा हा जोर दोन दिवसांपासून कायम राहिल्याने शहरातील बहुतांश सखल भागात पाणी साचले असून,
नदीसह ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. डोंगरावरून धबधबेदेखील वाहू लागले असून, भुशी धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.
पावसामुळे व्यापारीवर्गही सुखावला आहे. थंड
पडलेल्या बाजारपेठेतही उभारी येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: In Lonavla, in 24 hours, 163 mm