Lokmat Impact : हेलपाटे वाचले; उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरू करण्याबाबत 'लोकमत'कडून पाठपुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:27 IST2025-02-11T12:26:20+5:302025-02-11T12:27:09+5:30
मावळ तालुक्यातील नागरिकांना हवे कायमस्वरूपी उपयोगी कार्यालय' ही बातमी दिली होती

Lokmat Impact : हेलपाटे वाचले; उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरू करण्याबाबत 'लोकमत'कडून पाठपुरावा
पवनानगर : आठवड्यातील एक दिवस सोमवार या दिवशी मावळचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले हे मावळ तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थितीत राहिले व शेतकऱ्यांच्या सुनावण्या व नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लावण्यासाठी व कामाला सुरुवात केली.
वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय सुरू करण्याबाबत 'दैनिक लोकमत' मध्ये दि. ९ जानेवारी रोजी 'प्रांत कार्यालय गाठण्यासाठी १३० किलोमीटरचा प्रवास... मावळ तालुक्यातील नागरिकांना हवे कायमस्वरूपी उपयोगी कार्यालय' ही बातमी दिली होती. मावळमधील नागरिकांना जवळजवळ १०० ते १३० किलोमीटरचा प्रवास करून बावधन, औंध पुणे येथे जावे लागते, त्यासाठी मोठा प्रवास खर्च व वेळ वाया जातो. मावळातच उपविभागीय कार्यालय असावे, अशी नागरिकांची मागणी होती. या मागणीला पूर्णविराम दिला.
प्रांत दर सोमवारी वडगावमध्ये मावळ तालुक्यात १९१ महसुली गावे
१ मावळ तालुक्यात १९१ महसली गावे, तर मंडल कार्यालय १२ आहेत. वकील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महसूलमंत्र्यांची भेट घेऊन 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चंद्रशेखर बावनकुळे इथे आले असताना दाखवली. त्यावर मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मावळात तत्काळ उपविभागीय कार्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मावळ वडगाव वकील बार असोसिएशनच्या 3 पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांचा सत्कार करून स्वागत केले आहे. वस्तुस्थिती प्रसिद्ध केल्याने वकील बार असोसिएशन व नागरिकांनी 'दैनिक लोकमत'चे आभार मानले.
3 मावळ तालुक्यातील नागरिकांना यापूर्वी बावधन येथे जावे लागत होते. त्यासाठी त्यांचा वेळ आणि पैसाही जात होता. तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना समस्यांचा सामना करावा लागत होता. दर सोमवारी वडगाव मावळ येथे कामे होणार असल्याने नागरिकांची सोय झाली. १३०किलोमीटरचा प्रवास मावळ तालुक्यातील नागरिकांना प्रांत कार्यालयात जाण्यासाठी करावा लागत होता.
मावळ तालुका परिसरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन वडगाव मावळ येथील तहसील कार्यालय येथे आठवड्यातील एक दिवस दर सोमवारी येथे सुनावणी व नागरिकांच्या इतर सर्व कामे केली जातील. मुळशी तालुक्यातील नागरिकांची कामे बावधन येथील उपविभागीय कार्यालयात केली जातील. - सुरेंद्र नवले, उपविभागीय अधिकारी, मावळ मुळशी.