Leopard Dies : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बिबट्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:37 IST2024-12-20T12:37:30+5:302024-12-20T12:37:50+5:30
भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली.

Leopard Dies : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बिबट्याचा मृत्यू
वडगाव मावळ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पिंपळोली येथील बोगद्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १७) रात्री अकरा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर पिंपळोली बोगद्याजवळ किलोमीटर ६८ वर पुणे मार्गिकेवर ही दुर्घटना घडली. भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. यात गंभीर जखमी बिबट्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आयआरबी, वाहतूक पोलिस व वडगाव वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. मृत बिबट्याचे शव विच्छेदन करून दफन करण्यात आले.