शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Land scam case in Mundhwa : पौड न्यायालयात दोषारोपपत्र सादर;बावधन पोलिसांकडून दिग्विजय पाटीलचा तपास सुरूच

By नारायण बडगुजर | Updated: February 3, 2026 14:02 IST

या गुन्ह्यात पसार असलेला दिग्विजय पाटील याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर करून तपास सुरू ठेवला आहे.

पिंपरी : मुंढवा येथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात बावधन पोलिसांनी सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू आणि जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली शीतल तेजवाणी या दोघांविरुद्ध पौड न्यायालयात सोमवारी (दि. २) दोषारोपपत्र सादर केले. या गुन्ह्यात पसार असलेला दिग्विजय पाटील याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर करून तपास सुरू ठेवला आहे.

पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या ‘अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली महिला शीतल तेजवाणी आणि दस्त नोंदणी करणारे सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात ६ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात तेजवाणी हिला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बावधन पोलिसांनी तिचा ताबा घेतला. तर, या प्रकरणातील संशयित सहदुय्यम निबंधक तारू याला भोर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यातील संशयित पाटील हा अद्याप पसार आहे.

  गुन्हा दाखल झाल्यानंतर निर्धारित मुदतीत दोषारोपपत्र सादर करणे आवश्यक असल्याने बावधन पोलिसांनी सोमवारी तारू आणि तेजवाणी या दोघांविरुद्ध पौड न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तर, गुन्ह्यातील पसार संशयित दिग्विजय पाटील याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर करून तपास सुरू ठेवला आहे.  - विशाल गायकवाड (पोलिस उपायुक्त) 

English
हिंदी सारांश
Web Title : Mundhwa land scam: Charge sheet filed; Patil investigation ongoing.

Web Summary : Charge sheet filed against two in Mundhwa land scam involving 40-hectare land. Ravindra Taru, Sheetal Tejwani named. Fugitive Digvijay Patil investigation continues; supplementary charge sheet to be filed.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMundhvaमुंढवा