ठेकेदाराच्या त्रासाने मजूर दाम्पत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 16:55 IST2018-07-02T16:45:28+5:302018-07-02T16:55:45+5:30

ठेकेदारांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे

Labor's husband and wife commits suicide due to contracter harasshment | ठेकेदाराच्या त्रासाने मजूर दाम्पत्याची आत्महत्या

ठेकेदाराच्या त्रासाने मजूर दाम्पत्याची आत्महत्या

पिंपरी : ठेकेदारांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार पोलिसांनी ठेकेदाराला अटक केली आहे. 
मजूर दाम्पत्याने आत्महत्या केल्याची ही घटना २८ जूनला चऱ्होली येथे घडली. मुक्ता उत्तम सूर्यवंशी (वय ३१) आणि उत्तम तुकाराम सूर्यवंशी (वय ३३) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नावे आहेत.
भरत हनुमान काळे (वय २९, रा. दाभाडे वस्ती,चऱ्होली ) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम सूर्यवंशी हे आरोपी भरत काळे यांच्याकडे कामाला होते. आरोपी काळे यांनी त्यांच्या मजुरीचे पैसे न दिल्याने त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. तसेच आरोपी काळे याने केबलचे बंडल चोरल्याबाबत सुर्यवंशी यांची तक्रार मुख्य ठेकेदाराकडे केली होती. या कारणावरून देखील त्या दोघांमध्ये भांडण झाले होते. तसेच आरोपी काळे हा मुक्ता सूर्यवंशी यांना देखील त्रास देत होता. या सर्व त्रासाला कंटाळून दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Labor's husband and wife commits suicide due to contracter harasshment