घेतलेले पैसे न दिल्याने एकाचे अपहरण; चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 13:53 IST2021-03-24T13:52:37+5:302021-03-24T13:53:32+5:30

दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Kidnapping of one for non-payment; crime were registred against four people | घेतलेले पैसे न दिल्याने एकाचे अपहरण; चौघांवर गुन्हा दाखल

घेतलेले पैसे न दिल्याने एकाचे अपहरण; चौघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पूर्वी घेतलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाचे अपहरण केले. डुडुळगाव येथे मंगळवारी (दि. २३) सकाळी हा प्रकार घडला.

रतन अनिल देवगिरे (वय ३५), असे अपहृताचे नाव आहे. त्यांची पत्नी प्रतिभा रतन देवगिरे (वय २५, रा. डुडुळगाव) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश हंडे (वय ३०), पियुष मेहेत्रे (वय २५), परमा लोंढे (वय २८) बाळासाहेब मुंडे (वय २५, सर्व रा. भीम नगर, ता. औसा, जि. लातूर), अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अनिल यांनी पूर्वी घेतलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून आरोपी त्यांना चारचाकी वाहनातून जबरदस्तीने घेऊन गेले. तसेच फिर्यादी यांचे दीर अतुल यांना फोन करून पैशांची मागणी केली. 

याप्रकरणी फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Kidnapping of one for non-payment; crime were registred against four people