निगडी येथील अजंठानगरमधून अल्पवयीन मुलाचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 17:12 IST2019-02-24T17:11:30+5:302019-02-24T17:12:38+5:30

निगडी येथील अजंठानगर येथील गगनगिरी इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे शनिवारी रात्री अपहरण करण्यात आले आहे.

Kidnapping of minor child in Nigdi, Ajantanagar | निगडी येथील अजंठानगरमधून अल्पवयीन मुलाचे अपहरण

निगडी येथील अजंठानगरमधून अल्पवयीन मुलाचे अपहरण

पिंपरी : निगडी येथील अजंठानगर येथील गगनगिरी इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे शनिवारी रात्री अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणी गोकुळ धापटे या व्यकतीवर संशय व्यक्त करीत फिर्यादीने निगडी पोलिसांकडे तक्रार दाखल  केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब अण्णासाहेब वारे यांनी मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद निगडी पोलिसांकडे दाखल केली आहे. त्यांचा जयहिंद दादासहेब वारे हा मुलगा शनिवारपासून गायब झाला आहे. त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेले आहे. याच परिसरात राहाणाऱ्या गोकुळ धापटे यांच्यावर फिर्यादीने संशय व्यकत केला आहे. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Kidnapping of minor child in Nigdi, Ajantanagar