जलतरण तलावात बुडून आयटी अभियंत्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 15:12 IST2019-08-19T15:11:09+5:302019-08-19T15:12:00+5:30
जलतरण तलावात पाेहायला शिकत असलेल्या संगणक अभियंत्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

जलतरण तलावात बुडून आयटी अभियंत्याचा मृत्यू
पिंपरी : जलतरण तलावात पोहयला शिकत असलेल्या तरुणाचा पाच फूट खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १७) सायंकाळी सातच्या सुमारास थेरगाव येथील महापालिकेच्या कांतीलाल खिंवसरा नरसिंग पाटील जलतरण तलावात घडली. वैभव अंचल जैन (वय २३, रा. वाकड, मूळ रा. पंजाब) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हा संगणक अभियंता असून तो हिंजवडी येथील ‘कॉग्निझेन्ट’ या आयटी कंपनीत नोकरीला होता. वैभव शनिवारी सायंकाळी थेरगाव येथील महापालिकेच्या कांतीलाल खिंवसरा नरसिंह पाटील या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान तो पोहत असताना अचानक तळाशी जाऊ लागला. या वेळी जीवरक्षक सतीष कदम आणि नितेश कलापुरे यांनी त्याला तात्काळ बाहेर काढले. मात्र पाण्याबाहेर काढताच वैभवने उलटी केली. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.