भोसरीत किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड, चाकूने मारहाण; एक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 17:48 IST2022-04-16T17:47:18+5:302022-04-16T17:48:16+5:30

पिंपरी : किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड, चाकू व सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून एकाला जखमी केले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात ...

iron rod hit and stabbing for minor reasons one seriously injured | भोसरीत किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड, चाकूने मारहाण; एक जण गंभीर जखमी

भोसरीत किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड, चाकूने मारहाण; एक जण गंभीर जखमी

पिंपरी : किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड, चाकू व सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून एकाला जखमी केले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बालाजीनगर भोसरी येथे बुधवारी (दि. १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. 

विनोद सुबराव ताटे (रा. बालाजीनगर, भोसरी), असे जखमी झालेल्या चे नाव आहे. रवींद्र सुबराव ताटे (रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. १५) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रुक्मिणी विनोद ताटे, बाबू काळे, सत्यशीला बाबू काळे, सुभाष वाघमारे (सर्व रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे भाऊ विनोद ताटे यांना त्यांच्या राहत्या घरासमोर आरोपींनी शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड, चाकू व सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून गंभीर जखमी केले.

Web Title: iron rod hit and stabbing for minor reasons one seriously injured