शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव खर्चाचा लावलाय सपाटा

By admin | Updated: June 23, 2016 02:05 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीकडून ठेकेदारांना वाढीव खर्च देण्याचा सपाटा सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत वेगवेगळ्या पाच कामांसाठी ठेकेदराला

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीकडून ठेकेदारांना वाढीव खर्च देण्याचा सपाटा सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत वेगवेगळ्या पाच कामांसाठी ठेकेदराला ६६ लाख रुपयांचा वाढीव खर्च देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.डेअरी फार्म रोड सी ब्लॉक व इतर परिसरातील जलनिस्सारण नलिकांची सुधारणा करण्यासाठी महापालिकेकडून ३० लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. एका ठेकेदाराला २७.७७ टक्के कमी दराने म्हणजे २२ लाख ७५ हजार २४५ रुपयांना काम देण्यात आले. आता या कामासाठी स्थायीने वाढीव १३ लाख १४ रुपयांच्या वाढीव खर्चास मंजुरी दिली आहे. तसेच दापोडी पंपिंग स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुख्य जलनिस्सारण नलिकांची सुधारणा करण्याच्या कामासाठी ५२ लाख ४९ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. निविदा प्रक्रिया राबविली असता. एका ठेकेदाराला हे काम ३३.१ टक्के कमी दराने म्हणजेच ३६ लाख ९२ हजार ७५२ रुपयांना देण्यात आले. आता या कामासाठी स्थायी समितीने ९ लाख ९६ हजार ५४८ रुपयांच्या वाढीव खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या कामाचा खर्च आता ४६ लाख ८९ हजार ३०० रुपयांवर गेला आहे.रहाटणीतील शिवराजनगर व नखाते वस्तीमधील जलनिस्सारणविषयक कामे करणे यासह रहाटणी रस्ता ते तांबे शाळामार्गे दत्तनगर या भागात मलवाहिनी टाकण्यात आली असून, पुढे गजानननगरपर्यंत टाकण्यात येणार आहे. या कामासाठी २१ लाख ५९ हजार ६९६ रुपये मंजूर केले होते. आता पुन्हा या कामासाठी स्थायीने १४ लाख ३ हजार ८०९ रुपयांच्या वाढीव खर्चास मंजुरी दिली आहे.रहाटणी व पिंपळे निलखमध्ये जलनिस्सारणविषयक देखभाल दुरुस्तीचे काम ठेकेदाराला १० लाख ९४ हजार ८२६ रुपयांना देण्यात आले होते. स्थायी समितीने १८ लाख २४ हजार ७७४ रुपयांच्या वाढीव खर्चाला मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)