शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

चौका चौकांत वाढली हुल्लडबाजी, वाढदिवसानिमित्त रात्री अपरात्री टोळक्यांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 03:43 IST

मित्रमंडळी, राजकीय नेत्यांचे वाढदिवस मध्यरात्रीच्या सुमारास चौकांमध्ये साजरा करून हुल्लडबाजी करण्याचे प्रमाण भोसरी परिसरात वाढले आहे.

भोसरी : मित्रमंडळी, राजकीय नेत्यांचे वाढदिवस मध्यरात्रीच्या सुमारास चौकांमध्ये साजरा करून हुल्लडबाजी करण्याचे प्रमाण भोसरी परिसरात वाढले आहे. वेळ, काळ न पाहता फटाक्यांची आतषबाजी करत रस्त्यावर केक कापून गोंधळ घातला जात आहे. ‘फेसबुक लाईव्ह’ करत हा धिंगाणा जगजाहीर केला जात असताना रात्र गस्तीवरील पोलीस बोटचेपी भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे. वायसीएम रुग्णालयातील नुकत्याच घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा प्रकारांना चाप लावण्याची मागणी होत आहे.दहा गाव दुसरी तेव्हा एक गाव भोसरी असे म्हटले जाते. येथील कार्यकर्त्यांच्या तºहा देखील निराळ्या आहेत. मागील दीड-दोन वर्षांपासून रात्री बाराच्या ठोक्याला चौकात, रस्त्यावर वाढदिवस साजरा करून गोंधळ घालण्याचे प्रमाण वाढले आहे. नेतेमंडळींपासून ते गल्लीबोळातील कार्यकर्ते, मित्र मंडळींचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला जात आहे. ह्यसरप्राईजह्ण देण्याच्या नावाखाली ही मंडळी कुठल्यातरी चौकात गोळा होतात. फटाक्यांची आतषबाजी करून केक कापला जातो. त्यासाठी तलवार, चॉपरचाही वापर केला जातो. हा केक तोंडाला फासण्यासाठी एकच स्पर्धा लागते. बिअरची बाटली अंगावर ओतली जाते. अंडेही फोडले जाते. एवढ्यावरही ही मंडळी थांबत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी उभे असल्याचे भान न राखता धूम्रपानापासून ते शॅम्पेनच्या बाटल्या फोडेपर्यंत टोळक्यांची मजल जाते.गोंधळ, आरडाओरडा करत हे ‘सेलिब्रेशन’ सुरू असते. वाढदिवसाचा आनंद व्यक्त करायचा म्हणून जोरजोरात हॉर्न वाजवत वाहने रस्त्यावरून सुसाट फिरवली जातात. चारचाकी वाहनांमधील ध्वनिक्षेपकांवर जोरजोरात गाणी वाजवली जातात. मध्यरात्री उशिरापर्यंत किंचाळणे, गोंगाट करण्याचे प्रकार सुरू असतात. घरामध्ये असलेले लहान बाळ, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, हृदयरुग्ण यांना ध्वनिप्रदूषणाचा प्रचंड त्रास होतो. याबाबत जाब विचारायला गेल्यास वादाचेही प्रकार घडत आहेत. सार्वजनिक शांतता सर्रास भंग होत आहे. रात्र गस्तीवरील पोलीसच या हुल्लडबाजीकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्याकडे कोणीही तक्रार करायला पुढे येत नाहीत. विशेष म्हणजे या धिंगाण्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते. सध्या तर ‘फेसबुक लाईव्ह’मुळे ह्यसोशल मीडियावर ‘सेलिब्रेशन’ जगभर पोहचवणे सहज शक्य झाले आहे. मोठी घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांचा बंदोबस्त करायला हवा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.रस्त्यावर वाढदिवसाच्या नावाखाली हुल्लडबाजी वाढत असताना दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) टोळक्याने वाढदिवस साजरा करण्यासाठी घातलेला गोंधळ पोलीस यंत्रणेसाठी गांभीर्याने विचार करण्यासाठी भाग पाडणारा आहे.भोसरीतील जुना पीसीएमटी चौक, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर चौक, लांडेवाडी चौक, गवळीमाथा, स्पाईन रोड आदी ठिकाणी महिन्यातून दोन-तीन वाढदिवस अशा पद्धतीने साजरे केले जातात. भोसरी आणि परिसरात यापूर्वी रस्त्यावरच्या वाढदिवस सेलिब्रेशनमुळे वादावादीचे प्रकार घडले आहेत.फुटकळ ग्रुप अन् राजकीय आधारस्तंभवाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स कोणी लावावेत, याला सध्या कोणतीही मर्यादा राहिलेली नाही. गल्लीबोळातील सोम्या-गोम्याचेही वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फ्लेक्स जागोजागी झळकतात, असे फ्लेक्स लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते, याची साधी कल्पनादेखील वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ करणाºयांना नसते. शुभेच्छा देणारा अमूक ग्रुप, तमूक ग्रुप आणि त्यावर स्थानिक राजकीय नेत्यांची आधारस्तंभ म्हणून छबी झळकत असते, त्यामुळे महापालिकेचा अतिक्रमण विभागही कारवाईकडे डोळेझाक करतो. वाढदिवसाच्या हुल्लडबाजीवर वायफळ खर्च करून फुकटची फ्लेक्सबाजी करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड