शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पिंपरी चिंचवडमध्ये मंगल कार्यालयाच्या परिसरात महिलांच्या सोनसाखळी चोरीत होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:56 AM

सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांनी मंगल कार्यालयांकडे आपला मोर्चा वळविला असून, मंगल कार्यालयाच्या परिसरात महिलांच्या सोनसाखळी चोरी होत असताना, मंगल कार्यालयातही चोरटे दागिन्यांवर डल्ला मारू लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. 

ठळक मुद्देमहाडिक कुटुंबीयांना ताथवडे येथील मंगल कार्यालयात चोरट्यांचा आला कटू अनुभवमंगल कार्यालयाच्या परिसरात चोरटे दागिन्यांवर डल्ला मारू लागल्याच्या घटनांमध्ये वाढ

पिंपरी : लग्न समारंभासाठी सातारा येथून वाकडला आलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे एक लाख पाच हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. ही घटना मागील आठवड्यात घडली. ही घटना ताजी असतानाच, काळेवाडीतील महाडिक कुटुंबीयांना ताथवडे येथील मंगल कार्यालयात चोरट्यांचा असाच कटू अनुभव आला. सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांनी मंगल कार्यालयांकडे आपला मोर्चा वळविला असून, मंगल कार्यालयाच्या परिसरात महिलांच्या सोनसाखळी चोरी होत असताना, मंगल कार्यालयातही चोरटे दागिन्यांवर डल्ला मारू लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सातारा येथून शोभा शिंदे या नातेवाइकांच्या लग्नसमारंभासाठी पुण्यात वाकड येथे आल्या. काळाखडक झोपडपट्टी जवळील कार्यालयात लग्न होते. मंगल कार्यालयाजवळच मुंजोबानगर गल्ली नं. २ येथे नवऱ्या मुलाचे घर असल्याने त्या दुपारी लग्नघरी पायी जात होत्या. तेवढ्यात तेथे दुचाकींवरून आलेल्या चोरट्यांनी चपळाईने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. मंगल कार्यालयातून दोन लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली असून, लग्न समारंभात तरी महिलांनी दागिने वापरावेत की नाही? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. लगीनघाईचा फायदा घेत चोरट्याने रोख रकमेसहित दोन लाखांचा ऐवज असलेली पर्स पळवून नेली. ही घटना ताथवडे येथील मंगल कार्यालयात घडली. राजेंद्र रामचंद्र महाडिक (वय ५४, रा. जोतिबानगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दिली. ताथवडे येथील मंगल कार्यालयात नातेवाइकांच्या लग्नाला गेलेले असताना महाडिक यांच्या पत्नीने त्यांची पर्स मंगल कार्यालयाच्या एका खोलीत ठेवली होती. 

टॅग्स :wakadवाकडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड