पिंपरीत घरात घुसून दागिने चोरल्याची घटना, २८ हजारांचे सोन्याच्या दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 11:44 IST2021-06-01T11:43:57+5:302021-06-01T11:44:20+5:30

पहाटेच्या सुमारास शितलानगरमध्ये घडली घटना

The incident of breaking into a house in Pimpri and stealing jewelery, lampas with gold jewelery worth Rs 28,000 | पिंपरीत घरात घुसून दागिने चोरल्याची घटना, २८ हजारांचे सोन्याच्या दागिने लंपास

पिंपरीत घरात घुसून दागिने चोरल्याची घटना, २८ हजारांचे सोन्याच्या दागिने लंपास

ठळक मुद्देदाराची कडी तोडून केला प्रवेश

पिंपरी : अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातून २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले. शितला नगर, देहूरोड येथे सोमवारी (दि. ३१) पहाटे घरफोडीची ही घटना घडली. 

जयवंत दगडू कुंभार (वय ५९, शितला नगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी सोमवारी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभार यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title: The incident of breaking into a house in Pimpri and stealing jewelery, lampas with gold jewelery worth Rs 28,000