पिंपरीत टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड करून टेम्पोचालकाला लुटले

By नारायण बडगुजर | Updated: July 18, 2022 19:49 IST2022-07-18T19:49:27+5:302022-07-18T19:49:39+5:30

वाहनांची तोडफोड करून सुमारे १६ हजार रुपयांचे नुकसान करत परिसरात दहशत निर्माण केली

in pimpri the vehicles were vandalized and the driver of the tempo was robbed | पिंपरीत टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड करून टेम्पोचालकाला लुटले

पिंपरीत टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड करून टेम्पोचालकाला लुटले

पिंपरी : सात ते आठ जणांच्या टोळक्याने राडा घालत दहशत निर्माण केली. एका टेम्पो चालकाला लुटून त्याच्या टेम्पोची आणि अन्य सात ते आठ वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. १६) रात्री रामनगर, चिंचवड येथे घडली. बळीराम सुभाष बिराजदार (वय ३४, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अल्पवयीन मुले आणि अन्य चार ते पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा टेम्पो घेऊन रामनगर चिंचवड येथे थांबले होते. त्यावेळी सात ते आठ जणांचे टोळके तिथे आले. टोळक्याने फिर्यादीचा १० हजारांचा मोबाईल फोन आणि पाच हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यांनतर परिसरातील सात ते आठ वाहनांची तोडफोड करून सुमारे १६ हजार रुपयांचे नुकसान करत परिसरात दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: in pimpri the vehicles were vandalized and the driver of the tempo was robbed