पिंपरी-चिंचवडमध्ये ट्रेडींगची बनावट वेबसाईट बनवून तब्बल २७ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 17:09 IST2022-11-18T17:08:15+5:302022-11-18T17:09:43+5:30
सहा मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल..

पिंपरी-चिंचवडमध्ये ट्रेडींगची बनावट वेबसाईट बनवून तब्बल २७ लाखांची फसवणूक
पिंपरी : ट्रेडीेंगची बनावट वेबासाईट तयार करून ती खरी असल्याचे भासवून तब्बल २६ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना एप्रिल २०२२ ते १७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत रहाटणी येथे घडली. या प्रकरणी विश्वनाथ मोहन गोसावी (वय ७२, रा. रहाटणी) यांनी गुरुवारी (दि.१७) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुंतवणुकीसाठी फोन करणाऱ्या सहा मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अजित यास फोन करून सुरज, जयदीप, प्रतिक यांनी आपण ऑटो एफएक्स ट्रेड या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. तसेच कंपनीची ट्रेडींगची बनावट वेबसाईट तयार करून ती खरी असल्याची बतावणी करून अजित यास ट्रेड्रींग केल्यास जास्तीत जास्त फायदा मिळवून देऊ, असे अमिष दाखवले. तसेच अजित याला ट्रेडींग अकाऊंट तयार करण्यास लावून ए.यु.स्मॉल फायनान्स बॅँक खात्यावर वेगवेगळी कारणे सांगून सोळा लाख ९१ हजार रुपये गुंतवण्यास प्रवृत्त केले.
तसेच फॉरेक्स ट्रेडींगच्य आयडीवर चार कोटीचा नफा झाल्याचे दाखवत पुन्हा दहा लाख रुपये देण्यास भाग पाडून अजित याची तब्बल २६ लाख ९१ हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करत पैशाचा अपहार केला.