'मी चोर आहे, तुझे दागिने मला दे...' महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 19:30 IST2022-12-07T19:30:08+5:302022-12-07T19:30:33+5:30

पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

Im a thief give me your jewels snatched one of the necklace from the womans neck. | 'मी चोर आहे, तुझे दागिने मला दे...' महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

'मी चोर आहे, तुझे दागिने मला दे...' महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी : गाडीवरून जात असलेल्या महिलेला थांबवून मी चोर आहे, तुझे दागिने मला दे असे म्हणत महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना मंगळवारी (दि.६) दुपारी अडीच्या सुमारास नेरे येथे घडली. या प्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्यानतंर महिलेने आराडाओरडा केला. तेंव्हा आरोपीने फिर्यादीचे तोंड दाबून  फिर्यादीचे कानातील दागिने, बोटातील अंगठी तसेच फिर्यादीचा २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावला. फिर्यादी मदतीसाठी ओऱडली असता आरोपीने त्याच्या हातातील उसाच्या कांडक्याने फिर्यादीला मारहाण करत दुचाकीवर पळ काढला.

Web Title: Im a thief give me your jewels snatched one of the necklace from the womans neck.