‘मला पोलीस ठाण्यात न्याल तर याद राखा’; पोलिसांना आरोपीची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 16:07 IST2022-07-30T16:05:20+5:302022-07-30T16:07:08+5:30

पिंपळे गुरव येथील घटना...

If you take me to the police station remember me accused threatened police | ‘मला पोलीस ठाण्यात न्याल तर याद राखा’; पोलिसांना आरोपीची धमकी

‘मला पोलीस ठाण्यात न्याल तर याद राखा’; पोलिसांना आरोपीची धमकी

पिंपरी : ‘रेकॉर्ड’वरील आरोपीवर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी आरोपी कोयता घेऊन पोलिसांच्या अंगावर धावत गेला. तसेच पोलिसांना धमकीही दिली. पिंपळे गुरव येथे शुक्रवारी (दि. २९) दुपारी वैदू वस्ती, पिंपळे गुरव येथे ही घटना घडली.

मनोज गांधी लोखंडे (वय २०, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अनिल देवकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगवी पोलीस त्याच्या घरी गेले. त्याला पोलिसांसोबत सांगवी पोलीस ठाण्यात येण्याबाबत कळवले. त्यावेळी त्याने घरातून कोयता आणून पोलिसांच्या अंगावर धावून आला. तुम्ही मला पोलीस ठाण्यात घेऊन जाल तर याद राखा, अशी धमकी आरोपीने दिली. पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: If you take me to the police station remember me accused threatened police