‘तू मला हो म्हणती की नाही, मी आत्महत्या करेन’; अल्पवयीन मुलीला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 13:02 IST2022-11-06T13:01:46+5:302022-11-06T13:02:02+5:30
तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली

‘तू मला हो म्हणती की नाही, मी आत्महत्या करेन’; अल्पवयीन मुलीला धमकी
पिंपरी : अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तू मला हो म्हणती की नाही ते मला दोन ते तीन दिवसांत सांग, नाही सांगितले की मी आत्महत्या करेन, अशी धमकी तरुणाने दिली. याप्रकरणी तरुणाला पोलिसांनीअटक केली. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्टेंबर २०२१ ते ४ ऑक्टोबर २०२२ या कालाधीत हा प्रकार घडला.
आकाश नारायण जाधव (वय २०, रा. दिघी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी १५ वर्षीय मुलीने शुक्रवारी (दि. ४) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित फिर्यादी अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात जाता येता आरोपी तिचा पाठलाग करायचा. तू मला आवडते, तू माझ्याशी बोल, तू जर नाही बोलली तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी आरोपी देत होता. तसेच आरोपीने शुक्रवारी (दि. ४) पुन्हा फिर्यादीचा पाठलाग केला. तू मला हो म्हणती का नाही, ते मला दोन ते तीन दिवसांत सांग. नाही सांगितले की मी आत्महत्या करेन, अशी धमकी देऊन आरोपी निघून गेला. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.