'तू घरी चल नाही तर येथेच तुला गोळी घालील'; पतीने पत्नीवर गोळी झाडण्याचा केला प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 19:47 IST2024-12-31T19:47:18+5:302024-12-31T19:47:27+5:30

पिस्तुलचा ट्रिगरचा न दबल्याने पत्नीसह तिघांचे प्राण वाचले

'If you don't go home, you will be shot here', husband tries to shoot wife | 'तू घरी चल नाही तर येथेच तुला गोळी घालील'; पतीने पत्नीवर गोळी झाडण्याचा केला प्रयत्न

'तू घरी चल नाही तर येथेच तुला गोळी घालील'; पतीने पत्नीवर गोळी झाडण्याचा केला प्रयत्न

चाकण : तू घरी चल नाही तर येथेच तुला गोळी घालील, असे म्हणत पतीने पत्नी आणि सासू- सासर्याला मारण्यासाठी गावठी पिस्तुलातून गोळी झाडत असताना पिस्तुलचा ट्रिगरचा न दबल्याने पत्नीसह तिघांचे प्राण वाचले.ही घटना येथे रविवारी (दि. २९) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारासताच्या निघोजे (ता. खेड ) येथे घडली.

हरिष अशोक काकडे (वय,२४, रा. शिवाजीवाडी,मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.याबाबत त्याच्या २१ वर्षीय पत्नीने सोमवारी (दि. ३०) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिलेने आपल्यासोबत मोशी येथे सासरी यावे यासाठी आरोपी निघोजे येथे आला होता. त्याचे पत्नीशी भांडण झाल्यावर तिच्या हातातील मोबाइल त्याने खेचून घेतला. तू घरी चल नाहीतर येथेच तुला गोळी घालेल, अशी धमकी त्याने पत्नीला दिली. त्यानंतर आरोपी हरीष काकडे सासर्याला म्हणाला की मला तुमच्याशी १० मिनिटे बोलायचे आहे,असे म्हणत त्याने कमरेला खोचलेली पिस्तुल बाहेर काढून लोड केली. तुमच्या तिघांना मी जिवंत ठेवत नाही,असे म्हणून पत्नीच्या दिशेने पिस्तुल रोखले.आरोपी काकडे याने ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र गावठी पिस्तुल असल्याने त्याचा ट्रिगर दाबला गेला नाही.

पिस्तुल रोखल्याचे लक्षात येताच पत्नीने पतीवर झडप घालून त्याच्या हातातील पिस्तुल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिच्या मदतीला आई वडिलही आले. त्या तिघांनी मिळून हरिष काकडे याच्या हातातून पिस्तुल हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. तुम्ही जर पोलिसात तक्रार दिली तर मी दोन-तीन महिने जेलामध्ये जाईल. मात्र सुटून आल्यावर मी तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी त्याने सासर्याला फोन करून दिली.पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Web Title: 'If you don't go home, you will be shot here', husband tries to shoot wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.