विवाहितेच्या छळ प्रकरणी पती, सासूवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 19:04 IST2021-05-27T19:04:08+5:302021-05-27T19:04:16+5:30

अनेक महिलांसोबत तुमचे अनैतिक संबंध आहेत, याबाबत विचारणा केली असता पतीने केली मारहाण

Husband, mother-in-law charged in marital harassment case | विवाहितेच्या छळ प्रकरणी पती, सासूवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या छळ प्रकरणी पती, सासूवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देधमकी देत शारीरिक व मानसिक छळही केला

पिंपरी: आईकडून पैसे घेऊन ये, नाहीतर तुला नांदवणार नाही, असे म्हणून मारहाण करून विवाहितेचा छळ केला. या प्रकरणी तिच्या पती आणि सासूवर गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे येथे २९ सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ही घटना घडली.

पीडित विवाहितेने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती गणेश फूलचंद परदेशी (वय २६) आणि सासू पुष्पा फुलचंद परदेशी (वय ६५, रा. तळेगाव दाभाडे), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या पतीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. याबाबत महिलेने गणेश याला विचारणा केली. या कारणावरून चिडलेल्या गणेश याने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. तुझ्या आईकडून पैसे घेऊन ये नाहीतर तुला नांदवणार नाही, अशी धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला

 

Web Title: Husband, mother-in-law charged in marital harassment case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.