मालकाने मारली कर्मचाऱ्याच्या डाेक्यात काचेची बाटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 16:02 IST2018-12-23T16:01:16+5:302018-12-23T16:02:27+5:30

मालकाने कर्मचाऱ्याच्या डाेक्यात रागाने काचेची बाटली मारल्याने कामगार जखमी झाला. याप्रकरणी पिंपरी पाेलिसांनी मालकाविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

hotel owner break glass bottle on the head of his employee | मालकाने मारली कर्मचाऱ्याच्या डाेक्यात काचेची बाटली

मालकाने मारली कर्मचाऱ्याच्या डाेक्यात काचेची बाटली

पिंपरी :  मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या हॉटेल कामगाराला मालकाने हटकले. काम सोडून गेला आहेस, येथे का आलास? असा जाब विचारत रागाच्या भरात हॉटेल मालकाने कामगाराच्या डोक्यात शितपेयाची बाटली मारली. त्यात कामगार जखमी झाला आहे. शेहनाई हॉटेलमध्ये रविवारी ही घटना घडली. जगी गिरीजा या आरोपीविरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत खलासन पाल (वय ३८) असे फिर्यादीचे नाव आहे. विश्वजीत विश्वास या मित्राला भेटण्यासाठी  फिर्यादी हॉटेलवर गेला होता. त्यावेळी मालकाने त्यास पाहिले. तू कशासाठी येथे आलास असे म्हणत हॉटेल मालकाने फिर्यादीच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. फिर्यादीच्या डोक्यास जखम झाली असून या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: hotel owner break glass bottle on the head of his employee