रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यानेच लांबवली साेन्याची चैन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 14:49 IST2018-09-06T14:49:01+5:302018-09-06T14:49:46+5:30

तपासणीसाठी रुग्णालयात अालेल्या महिलेची चैन सफाई कर्मचाऱ्याने लांबविल्याची घटना समाेर अाली अाहे.

hospital staff stole gold chain | रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यानेच लांबवली साेन्याची चैन

रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यानेच लांबवली साेन्याची चैन

पिंपरी-चिंचवड (वाकड) : नियमित आरोग्य तपासणीस आलेल्या महिलेची  दीड ताेळ्याची सोनसाखळी रुग्णालयातीलच सफाई कर्मचाऱ्याने चोरल्याचा प्रकार बुधवारी (दि ५) दुपारी उघडकीस आला याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

      याबाबत माहिती अशी आयटी पार्क हिंजवडी येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी एक महिला नियमित तपासणीसाठी गेली होती तीचा एक्स रे काढायचा असल्याने तीने गळ्यातील सोन्याची चैन काढून एक्सरे मशीनवर ठेवली मात्र तपासणी झाल्यानंतर ती चैन न घेता ती विसरून गेली. काही वेळाने तिच्या लक्षात आल्याने दुसऱ्या दिवशी तिने रुग्णालय गाठून विचारणा केली असता येथील कर्मचाऱ्यांनी तिच्याशी उद्धट वर्तन केले.
तिच्यावरच रुग्णालय प्रशासनाने खोटे आरोप केले यानंतर महिलेने थेट हिंजवडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

      यानंतर रुग्णालयात गेलेल्या हिंजवडी पोलिसांना मोठ्या मुश्किलीने सीसीटीव्ही फुटेज घेता आले ते तपासले असता येथील सफाई कामगारानेच ती सोनसाखळी चोरल्याचे स्पष्ट झाले त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन सोनसाखळी देखील हस्तगत केली आहे.

Web Title: hospital staff stole gold chain