Hinjawadi Fire Incident : जनार्दनमामा एक दिवस अगोदर म्हणाले होते, 'बघतोच, एकएकेची वाट लावतो'
By विश्वास मोरे | Updated: March 21, 2025 20:11 IST2025-03-21T20:07:49+5:302025-03-21T20:11:00+5:30
जनार्दन याला गोवलं जात असल्याचा आरोप त्याची पत्नी आणि भावाने केला

Hinjawadi Fire Incident : जनार्दनमामा एक दिवस अगोदर म्हणाले होते, 'बघतोच, एकएकेची वाट लावतो'
पिंपरी :हिंजवडीतील बस आग घटनेत वेतन न दिल्याने आणि अपमानास्पद वागणूक देत असल्याने चालकानेच हत्याकांड केले. चार कामगाराचा बळी घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर घटनेच्या एक दिवस अगोदर जनार्दनमामा यांनी चिडून 'बघतोच, एकएकेची वाट लावतो!' असे कंपनी कामगारासमोर बोलल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तर चालकाची पत्नी आणि भाऊ यांनी आमच्या माणसास प्रकरणात गोवले जात आहे, अशी मागणी केली आहे.
हिंजवडी येथे ट्रॅव्हलर बसला आग लागल्याने बुधवारी चार कामगारांचा मृत्यू झाला. तर पाच कामगार जखमी झाले. पाच जण सुखरूप बाहेर पडले होते. अपघात नसून घातपात आहे, असा या प्रकरणाचा उलगडा करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. बस चालकानेच कट रचून कामगारांना ठार मारल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी दत्ता काळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यामुळे चालकावर खून आणि खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला आहे.
आणि येथून मिळाली तपासाला दिशा
घटना घडल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. बसमधील सहकाऱ्यांच्या जबाबात त्यात बसमधील सहकारी गुरुवारी विठ्ठल गेनु दिघे (वय ५५, रा.भुगाव), विकास कृष्णराव गोडसे (वय ५३, रा. कोथरुड) यांनी आपबिती सांगितली. 'बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही पुणे येथुन व्योमा ग्राफिक्स प्रिंटिंग प्रेस फेज येथे जात होती. त्यावेळी १४ कामगार व चालक जर्नादन हंबर्डीकर असे एकुण १५ जण होते. सह जात होतो. बस विप्रो सर्कल येथुन जात असताना चालक जनार्दन यानी बस थांबवेळी. खाली वाकुन ड्रायव्हर साईटचा उजव्या बाजुचा दरवाजा उघडला. पायाजवळ काहीतरी हालचाल केली आणि बाजुचा दरवाजा पुन्हा लॉक केला.
तेव्हा बसमध्ये उग्र स्वरुपाचा वास आला. परंतु बसमध्ये कोणतेही प्रकारचा स्पार्कचा आवाज झाला नाही. त्यानंतर बस थोडे अंतर पुढे गेल्यानंतर चालकाच्या उजव्या पायाजवळ आग लागुन धुर येउ लागला. त्याचवेळी जर्नादनने बस चालु ठेवुन बसच्या डाव्या दरवाजातुन उडी मारली. त्यावेळी आगीचा भडका उडाला. आम्हीही बसमधुन खाली उडी मारली. बसमधील आमचे सहकारी गुरुदास लोखरे, राजु चव्हाण, शंकर शिंदे, सुभाष भोसले यांना बसमधुन बाहेर पडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे अपघात वाचलेल्या दोघांनी सांगितले.
तर व्योमा ग्राफिक्सचे प्रविण रमेश कापडे (वय ३२) यांच्याकडे चौकशी केली. ' बसवरील चालक जनार्दन हुंबर्डीकर हे विचित्र स्वभावाचे होते. गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी शुल्लक कारणांवरुन कंपनीच्या कामगारांसोबत वेळोवळी वाद घातला. एक दिवस अगोदर जनार्दनमामा डब्बा घेवुन जात असताना मी आणि गोडसेसरांच्या केबिन बाहेर उभा होतो. तेंव्हा जनार्दन मामा म्हणत होते की, 'हे सगळे लयभारी झालेले आहेत. यांच्याकडे बघतोच, एकएकेची वाट लावतो, असे बोलल्याचे मी ऐकले होते, असे कापडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
गोवलं जात असल्याचा पत्नी आणि भावाचा आरोप
जळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी चालक जनार्दन हंबर्डीकर उर्फ मामा याच्याविरुद्ध कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केला आहे. मात्र, जनार्दन याला गोवलं जात असल्याचा आरोप त्याची पत्नी आणि भावाने केला आहे.
वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले नाही!
''ज्या बसला आग लागली, त्यामध्ये आरोपी जनार्दनचे सख्खे भावजी देखील होते, त्यामुळे ते आग कशी लावतील. शिवाय घटनेत वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले देखील नाही. त्यामुळे पेटत्या बसमधून ते सुखरूप बाहेर कसे पडले? आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावण्यासाठी केमिकल आणतांना त्यांना कंपनीतील कुणीच का रोखले नाही, असे अनेक प्रश्न जनार्दन हंबर्डीकरच्या कुटुंबियांनी उपस्थित केले आहेत.
जी कारणे सांगितली जात आहेत. बोनस मिळाला नाही इतर काही गोष्टी त्यापैकी काहीच माझ्या नवऱ्याने मला सांगितलेलं नाही. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. जर त्यांना पैसे मिळाले नसते तर त्यांनी मला पैसे दिले नसते. ते शुगर पेशंट होते. त्यांना या प्रकरणात गोवलं जात आहे. नक्की काय खरं आहे खोटं आहे, याचा तपास झाला पाहिजे. नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. - नेहा हंबर्डीकर (पत्नी)