'He' stolen the one lakhs 25 thousands for heart surgery | ‘त्याने ’ ह्दय शस्त्रक्रियेसाठी केली सव्वा लाखांची चोरी..
‘त्याने ’ ह्दय शस्त्रक्रियेसाठी केली सव्वा लाखांची चोरी..

पिंपरी : ह्दयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एकाने दुचाकीची डिक्की फोडून एक लाख २२ हजार रुपयांची चोरी केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अनिल सॅमियल गायकवाड (वय ५४, रा. पाटील चौक, दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमोल प्रकाश रावळ (वय ३६, रा. रिव्हर रेसिडेन्सी, फेज नं.२, देहू-आळंदी रोड, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल ७ मार्चला सायंकाळी पावणेसात वाजता चिंचवड स्टेशन येथे आले होते. दरम्यान, ते चिंचवड स्टेशन येथील प्रदीप स्वीटससमोर दुचाकी उभी करुन खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेले असता आरोपीने दुचाकीची डिक्की उघडून डिक्कीमधील दोन सोन्याच्या बांगड्या, एक मोबाईल असा १ लाख २२ हजार ७९६ रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
    त्यानंतर पिंपरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपी अनिल हा चोरी करताना आढळून आला. या घटनेची अधिक माहिती घेतली असता मूळचा दौंड येथील असलेला आरोपी सध्या थेरगाव, पडवलनगर येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी राहण्यास आल्याचे समोर आले. त्यानंतर १५ मार्चला त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आपण ह्दयाच्या उपचारासाठी दौंडहून पुण्याला आल्याचे आरोपीने सांगितले. तसेच उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याने चोरी केल्याचीही कबुली दिली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी त्याला अटक करुन १ लाख २२ हजार ५९६ रुपयांचा ऐवज जप्त केला.


Web Title: 'He' stolen the one lakhs 25 thousands for heart surgery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.