पत्नी नांदायला येत नाही म्हणून त्याने गाठले थेट माहेर अन्... ; चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 17:59 IST2021-04-06T17:58:55+5:302021-04-06T17:59:31+5:30

पत्नी नांदायला येत नाही म्हणून थेट त्याने माहेर गाठले...

He reached wife house An ...; crime registred against four people | पत्नी नांदायला येत नाही म्हणून त्याने गाठले थेट माहेर अन्... ; चौघांवर गुन्हा दाखल

पत्नी नांदायला येत नाही म्हणून त्याने गाठले थेट माहेर अन्... ; चौघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने थेट तिचे माहेर गाठले. तेथे तिच्या वडिलांसह नातेवाईकांना मारहाण केली. सद्गुरूनगर, भोसरी येथे रविवारी (दि. ४) रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली.

गणेश अरूण आढाव (वय २८), महेश अरूण आढाव (वय ३५), वैभव रमेश भोंडवे (वय २१), अरुण आढाव (वय ६०, सर्व रा. संत तुकारामनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष शिवाजी चौधरी (वय ४२, रा. सद्‌गुरुनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दोन मुली आणि पत्नीसह घरात होते. त्यावेळी त्यांचा जावई गणेश आढाव हा आपल्या नातेवाईक आरोपींसोबत तिथे आला. फिर्यादी चौधरी यांची मुलगी मोहिणी ही तिच्या पतीकडे नांदायला जात नसल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून शिवीगाळ केली. फिर्यादी आणि त्यांचा भाऊ बापू चौधरी याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचा व्याही अरुण आढाव याने फिर्यादी यांचा भाऊ बापू यास डोक्‍यात काठीने मारून जखमी केले. तुमच्याकडे पाहून घेईल, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: He reached wife house An ...; crime registred against four people