देहूरोड परिसरात पोलिसांकडे तक्रार केल्याने एकावर कोयता, तलवारीने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 15:10 IST2022-06-06T15:05:32+5:302022-06-06T15:10:01+5:30

दोन जणांनी एकावर खुनी हल्ला केला

He lodged a complaint with the police in Dehu Road area and was attacked with a machete and a sword | देहूरोड परिसरात पोलिसांकडे तक्रार केल्याने एकावर कोयता, तलवारीने वार

देहूरोड परिसरात पोलिसांकडे तक्रार केल्याने एकावर कोयता, तलवारीने वार

पिंपरी :पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या कारणावरून दोन जणांनी एकावर खुनी हल्ला केला. कोयता व तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी केले. देहूरोड येथे रविवारी (दि. ५) रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

अंजुम रहीस रंगरेज (वय २५, रा. देहूरोड) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कुणाल सकट आणि संतोष नागेश आण्णामले यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीच्या भावाच्या टेम्पोचे नुकसान केले म्हणून त्यांच्या विरोधात फिर्यादीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या कारणावरून चिडून जाऊन आरोपींनी फिर्यादीचा भाऊ मुसरफ रशीद रंगरेज याला कोयत्याने डोक्यात मारले तसेच तलवारीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मानेला मारून गंभीर दुखापत केली. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: He lodged a complaint with the police in Dehu Road area and was attacked with a machete and a sword