अनोळखी तरूणीला व्हिडीओ कॉल करून 'तो' झाला नग्न; गुन्हा दाखल

By नारायण बडगुजर | Updated: September 29, 2022 15:44 IST2022-09-29T15:42:21+5:302022-09-29T15:44:15+5:30

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार...

He got naked by making a video call to an unknown girl Filed a case pune crime | अनोळखी तरूणीला व्हिडीओ कॉल करून 'तो' झाला नग्न; गुन्हा दाखल

अनोळखी तरूणीला व्हिडीओ कॉल करून 'तो' झाला नग्न; गुन्हा दाखल

पिंपरी : साॅफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणीला व्हाॅटसअपवरून एका अनोळखी व्यक्तीने व्हिडिओ काॅल केला. त्यानंतर पूर्ण नग्न होऊन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे अश्लील कृत्य करून तरुणीचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. २८) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. 

पीडित तरुणीने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी साॅफ्टवेअर इंजिनियर आहे. फिर्यादी तिच्या पतीसह घरी असताना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादीच्या मोबाइलवर अनोळखी आरोपीने व्हाॅटसअपचा व्हिडिओ काॅल केला.

फिर्यादीने काॅल उचलला असता आरोपीने पूर्ण नग्न होऊन अश्लील कृत्य केले. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न करून आरोपीने फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे तपास करीत आहेत.

Web Title: He got naked by making a video call to an unknown girl Filed a case pune crime